E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात बकरी ईद उत्साहात
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
पुणे
: सर्वांना सुख-समृद्धी यावी, चांगले आरोग्य लाभावे तसेच देशात बंधुभाव, एकोपा वाढावा, अशी प्रार्थना करत मुस्लीम धर्मियांनी शनिवारी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद उत्साहात साजरी केली. सामुदायिक नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
पावसाच्या सरीत आणि सकाळच्या उत्साहपूर्ण वातावरणात ईदगाह मैदानावर मुलिस्म धर्मियांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण केले. तसेच शहर आणि उपनगरातील सर्व मशिदींमध्येही सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. त्यात मोठ्या संख्येने मूस्लिम बांधव सहभागी झाले होते. ईद निमित्त विविध संस्था, संघटनांकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ईदनिमित्त घरोघरीही खास तयारी करण्यात आली होती. त्यानंतर घरोघरी कुटुंबीयांनी एकत्र येऊन बिर्याणीसह शीरखुर्माचा आस्वाद घेतला. तर काहींनी गरजूंना मदत करीत ईद साजरी केली. कोंढवा, वानवडी, लष्कर परिसर, खडकी, कात्रज आदी ठिकाणी ईदचा उत्साह पाहायला मिळाला.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मौलाना निजामुद्दीन फकरूद्दीन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुना ईदगाह ट्रस्ट, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, पुणे कॅन्टोन्मेंट, पुणे महापालिकेच्या वतीने मुस्लिम धर्मियांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ईदगाह ट्रस्टचे झैनुल काझी, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ताहेर आसी आदींनी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत ईद साजरी केली. पुणे शहरातील दीडशेहून अधिक मशीदींमध्येही ईदनिमित्त सामुहिक नमाज अदा करण्यात आली. बकरी ईदला दानधर्म करण्याची प्रथा आहे. अनेकांनी यादिवशी गरजूंना मदत केली. समाज माध्यमांवरही बकरी ईदच्या सर्वधर्मिय नागरिकांकडून मुस्लिम धर्मियांना शुभेच्छा देण्यात आल्या.
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
बकरी ईदनिमित्त मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. शिबिराचे हे १५ वे वर्षे होते. तसेच मरणोत्तर देहदान आणि अवयवदान जनजागृती करण्यात आली. हे अभियान राज्यभरात आठवडाभर चालते. माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, माजी अतिरक्त पोलिस महासंचालक अशोक धिवर यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मुन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती डॉ. समशुद्दीन तांबोळी यांनी दिली.
Related
Articles
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !